
तब्बल आठ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच एक दिवसीय सामन्यात दणका बसला आहे. आगामीचे फलंदाज फेल ठरल्याने टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 66 धावांनी पराभव केला आहे. हा विजय मिळवत मालिकेत ऑस्ट्रेलिया ने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
#UPDATE | Sydney: Australia beat India by 66 runs in the first #IndiavsAustralia ODI match. https://t.co/vYkmuPPZZP
— ANI (@ANI) November 27, 2020
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत टीम इंडियासाठी 375 धावांचे आव्हान ठेवले. मात्र या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 308 धावांवर ऑल आऊट झाली

सलामीला फलंदाजीला आलेले शिखर धवन व मयंक अगरवाल यांनी बिनबाद 53 धावांची आघाडी घेतली. तेव्हा टीम इंडिया 375 चे आव्हान पेलू शकेल असे वाटले होते. मात्र हेजल वूडने मयंक अगरवालला माघारी पाठवत टीम इंडियाला पहिला धक्का दिला.

त्यानंतर आलेले विराट कोहली व श्रेयस अय्यर देखील फार काही करू शकले नाही. व्यवस्था 80 धावांवर 3 बाद अशी होती. लोकेश राहुल देखील फार काही करू शकला नाही.

त्यानंतर हार्दिक पांड्या व शिखर धवन यांनी टीम इंडियाची कमान सांभाळली. दोन्ही फलंदाजांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली.

हार्दिक पांड्याच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र फिरकीपटू झंपाने धवनला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर हार्दिक पांड्या देखील नर्वस नाईंटी वर आउट झाला त्यानंतरच्या हिंदुस्तानच्या अखेरचा फळीतील फलंदाजांनी पार निराशा केली टीम इंडिया 308 वर ऑल आउट झाली.
























































