ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधील 16 संघ पक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढल्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमधील सर्व 16 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये यजमान संघ आणि सर्वोत्तम रँकिंगमधील नऊ संघांसह पात्रता फेरीतील सहा संघांचा सहभाग असणार आहे. पात्रता फेरीमधून आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅण्ड, ओमान, पीएनजी व स्कॉटलंड या देशांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेश केला आहे.

ओमान, स्कॉटलंडचा प्रवेश

ओमान व स्कॉटलंड या दोन संघांनी बुधवारी रात्री ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधील प्रवेश पक्का केला. ओमानने हाँगकाँगवर 12 धावांनी सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केले, तर स्कॉटलंडने यूएईला 90 धावांनी धूळ चारत पुढे पाऊल टाकले.

उपांत्य फेरीच्या लढती आज

पात्रता फेरीतून सहा संघांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रवेश केला असला तरी या स्पर्धेची उपांत्य फेरी व फायनलची लढत अद्याप बाकी आहे. त्यासाठी आता चुरस रंगणार आहे. शुक्रवारी होणाऱया दोन उपांत्य फेरीच्या लढतीत आयर्लंड-नेदरलॅण्ड व पीएनजी-नामिबिया हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शनिवारी फायनलची लढत रंगणार आहे.

रँकिंगमधील सर्वोत्तम नऊ संघ

  • हिंदुस्थान
  • पाकिस्तान
  • इंग्लंड
  • दक्षिण आफ्रिका
  • न्यूझीलंड
  • वेस्ट इंडीज
  • अफगाणिस्तान
  • श्रीलंका
  • बांगलादेश

पात्रता फेरीतून आलेले संघ

  • आयर्लंड
  • नामिबिया
  • नेदरलॅण्ड
  • ओमान
  • पीएनजी
  • स्कॉटलंड