
सामना ऑनलाईन । मुंबई
2003 चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वेमध्ये आयोजित करण्यात आला होता. इतिहासामध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये 14 संघ सहभागी झाले होते. 9 फेब्रुवारी ते 23 मार्च 2003 या दरम्यान हा वर्ल्डकप रंगला. अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावला.
वर्ल्डकप इतिहासाची सफर – 1999 पासून कांगारूंचा विजयरथ सुरू
वर्ल्डकपमध्ये सहभागी संघांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. अ गटामध्ये सात, तर ब गटामध्ये सात संघ होते. अ गटातून तीन आणि ब गटातून तीन संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरणार होते. ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, केनिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेचा संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरला होता. वर्ल्डकप इतिहासामध्ये पहिल्यांदाच केनियाचा संघ उपांत्यफेरीत पोहोचला. उपांत्यफेरीचे सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका, व हिंदुस्थान आणि केनिया संघात रंगला.
हातातोंडाशी आलेला सामना गमावणाऱ्यात हिंदुस्थानचा पहिला नंबर
पहिल्या लढतीमध्ये श्रीलंकेच्या दमदार गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 50 षटकात फक्त 7 हाज 212 धावा करू शकला. श्रीलंका विजयी होणार असे वाटत असतानाच ब्रेट लीच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेची अवस्था 38.1 षटकात 7 बाद 123 झाली. यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या लढतीत हिंदुस्थानसमोर केनियाचे आव्हान होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 270 धावा केल्या. यात सर्वाधिक योगदान दिले ते कर्णधार सौरव गांगुली याने. गांगुलीने 111 धावांची खेळी केली. त्यानंतर झहीर खान, आशिष नेहरा आणि श्रीनाथ या तिकडीच्या जोरावर हिंदुस्थानने केनियाला फक्त 179 धावांमध्ये रोखत 91 धावांनी विजय मिळवला अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीचा थरार
अंतिम लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट गमावून 359 धावांचा डोंगर उभारला. रिकी पॉन्टिंगने नाबाद 140 धावा करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या रचून दिली. यानंतर हिंदुस्थानचा डाव 234 धावांमध्ये गुंडाळत ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवला आणि वर्ल्डकपवर मोहोर उमटवली.
ठळक वैशिष्ट्ये –
– वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच 14 संघाचा समावेश करण्यात आला.
– सचिनने पाकिस्तानविरुद्ध खेळलेली 75 चेंडूतील 98 धावांची खेळी कायम लक्षात राहणारी.
– सचिनने वर्ल्डकप इतिहासामध्ये सर्वाधिक धावांचा (673) विक्रम केला.
– सचिन आणि चामिंडा वास यांना संयुक्तपणे मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.




























































