
सामना ऑनलाईन | मुंबई
वर्ल्डकपमध्ये हातातोंडाशी आलेला सामना थोडक्यात गमावण्यात हिंदुस्थानचा संघ आघाडीवर आहे. लागोपाठच्या दोन वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानला अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस एकाच संघाने हिंदुस्थानचा पराभव केला. हे दोन्ही सामने जिंकले असते तर त्या वर्ल्डकपमधील हिंदुस्थानच्या कामगिरीचा आलेख वेगळा असता.
वर्ल्डकप इतिहासाची सफर – आणि 1987 पासून ऑस्ट्रेलिया पर्व सुरू
युवीपुढे भज्जी, कुंबळेही फेल; वर्ल्डकपमध्ये गोलंदाजीत नोंदवला अनोखा विक्रम
धोनी झाला बांगलादेशचा कर्णधार, फलंदाजी करताना फिल्डिंग लावली
पहिला सामना आहे 1987 च्या वर्ल्डकपमधील आहे. 9 ऑक्टोबर 1987 ला चेन्नई येथे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या संघात हा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 270 धावा चोपल्या आणि हिंदुस्थानला 271 धावांचे आव्हान दिले. परंतु हिंदुस्थानचा संघ 49.5 षटकात 269 धावात गारद झाला आणि अवघ्या एका धावेने पराभूत झाला. हिंदुस्थानने शेवटचे 8 फलंदाज 62 धावात गमावले.

दुसरा सामना हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगला. 1 मार्च 1992 ला ब्रिस्बेन येथे रंगलेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 9 बाद 237 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि हिंदुस्थानला 47 षटकात 236 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मोहम्मद अझरुद्दीन याच्या नाबाद 93 धावांनंतरही हिंदुस्थानने हा सामना एका धावेने गमावला. हिंदुस्थानचे शेवटचे 2 फलंदाज धसमुसळेपणा करत धावबाद झाले.



























































