वर्ल्डकप इतिहासाची सफर – आणि 1987 पासून ऑस्ट्रेलिया पर्व सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेट इतिहासाच्या पहिल्या वर्ल्डकपची फायनल खेळलेल्या परंतु वर्ल्डकपपासून वंचित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचे सुवर्णयुग खऱ्या अर्थाने 1987 च्या चौथ्या वर्ल्डकपपासून सुरू झाले. पहिले तीन वर्ल्डकप इंग्लंडच्या धरतीवर खेळले गेले, मात्र 1987 ला पहिल्यांदाच इंग्लंडबाहेर वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले. चौथा वर्ल्डकपचे आयोजन करण्याचा मान हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दो देशांना मिळाला. या वर्ल्डकपचे आखणी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सामना हा 60 ऐवजी 50 षटकांचा करण्यात आला.

स्पर्धा गाजवणारे परंतु वर्ल्डकपपासून ‘वंचित’ राहिलेले दहा दिग्गज खेळाडू
Photo : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

चौथ्या वर्ल्डकपमध्ये देखील आठ संघ सहभागी झालो होते. प्रत्येकी चार संघ दोन गटात विभागण्यात आले. साखळी फेरीत प्रत्येक गटातील संघांचे परस्पराविरुध्द दोन सामने झाले. दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्यफेरीत आणि उपांत्यफेरीतील विजेते अंतिम फेरीत असे या स्पर्धेचे स्वरुप होते. या स्पर्धेत आयसीसीचे कायमस्वरुपी सदस्य सात संघ होते तर 1987 मध्ये दुस-यांदा झिंम्बावे विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. रिलायन्सने हा वर्ल्डकप प्रायोजित केल्याने भारतीय उपखंडात झालेला हा वर्ल्डकप ‘रिलायन्स वर्ल्डकप’ म्हणून ओळखला जातो.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये अंतिम सामना
अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने 1987 च्या वर्ल्डकपममध्ये अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियासमोर अंतिम लढतीत इंग्लंडचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात 5 बाद 253 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड बून यांनी 125 चेंडूत 75 धावांची खेळी केली. यानंतर इंग्लंडला पन्नास षटकात 8 बाद 246 धावांवर रोखत ऑस्ट्रेलियाने सात धावांनी विजय मिळवला आणि वर्ल्डकप उंचावला.

हिंदुस्थानची कामगिरी
आशिया खंडात झालेल्या या वर्ल्डकपमध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानचा दबदबा दिसून येईल असे वाटले होते. हिंदुस्थानने उपांत्यफेरीत प्रवेश करून क्रीडाप्रेमींच्या आशाही जागवल्या. उपांत्यफेरीचा सामना इंग्लंड आणि हिंदुस्थानमध्ये वानखेडेच्या मैदानावर रंगला. या लढतीत टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली आणि इंग्लंडचा डाव 6 बाद 254 धावांपर्यंत रोखले. त्यानंतर हिंदुस्थानला सामना जिंकण्याची सुवर्णसंधी असताना शेवटचे पाच फलंदाज 15 धावात गमावून हिंदुस्थान विश्वचषकातून बाहेर झाला. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 45.3 षटकात 219 धावांवर बाद झाला.