वर्ल्डकप इतिहासाची सफर – 1999 पासून कांगारूंचा विजयरथ सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि नेदरलँड या देशांमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचे सातवे पर्व रंगले. अंतिम लढतीमध्ये पाकिस्तानला दोन विकेटने मात देत ऑस्ट्रेलियाने विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले.

वर्ल्डकप इतिहासाची सफर – 1996 च्या वादग्रस्त विश्वचषकावर श्रीलंकेची मोहर

1999 च्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता आणि त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक गटातील तीन संघ सुपर सिक्समध्ये जाणार होते. तर सुपर सिक्समधील पहिले चार संघ उपांत्यफेरीत पोहोचणार होते. आणि त्यानंतर अंतिम सामना रंगणार होता. या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांगलादेश आणि स्कॉटलंडचे संघ सहभागी झाले होते. ‘अ’ गटातून दक्षिण आफ्रिका, हिंदुस्थान आणि झिंबाम्बे सुपर सिक्स साठी निवडले गेले होते. तर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ‘ब’ गटामधून निवडले गेले होते.

वर्ल्डकप इतिहासाची सफर 1992 – परिवर्तनाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान झाला विजेता

उपांत्यफेरीचा थरार
‘ब’ गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे दोन संघ उपात्यफेरीत पोहोचले होते. या लढतीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 241 धावा करत पाकिस्तानला 242 धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानने हे माफक लक्ष्य एक विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत झोकात अंतिम फेरी गाठली. ‘अ’ गटातून उपांत्य फेरीत आलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना रोमहर्षक झाला. टाय झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 213 धावा केल्या तर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडजी 213 धावांपर्यंतच पोहोची शकला. परंतु धावगटीच्या आधारे ऑस्ट्रेलियाला अंतिम लढतीचे तिकीट मिळाले.

ऑस्ट्रेलियाने मारली बाजी
20 जून 1999 ला रंगलेल्या अंतिम लढतीत शेन वॉर्नच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ गडबडून गेला आणि पाकिस्तानने 30 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान विसाव्या षटकात गाठत वर्ल्डकप उंचावला.