सोनिया गांधी पहिल्यांदाच सोशल मीडियावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या पहिल्यांदाच सोशल मीडियावर आल्या आहेत. गुरुवारी त्यांनी इन्स्टाग्राम खाते उघडले आहे.

अवघ्या तीन तासांमध्ये त्यांना 13 हजार फॉलोअर्स मिळाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या अकाऊंटवरून राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला फॉलो केले आहे. पहिली पोस्टसुद्धा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आगामी `Belonging : A Journey of Love’ या पुस्तकाचा व्हिडीओ शेअर केला. हे पुस्तक 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे.