
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. यावेळी त्यांना लेखनासाठी ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु हा पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी एका सभेत रशियाशी संबंधित चौकशीच्या वृत्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार मिळवलेल्या पत्रकारांवर टीका केली. तसेच अनेक युद्धे थांबवल्याचे श्रेय घेत पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पत्रकारांनी या प्रकरणात चुकीचे वृत्तांकन केले होते आणि त्यांना त्यासाठी पुरस्कार मिळायला नको होता. ट्रम्प यांनी आतापर्यंत 19 पुस्तके लिहिली आहेत.



























































