
ऑनलाईन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म ईबेने एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कपातीसंबंधी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी इयानोन यांनी कर्मचाऱयांना एक ई-मेल पाठवला आहे.
कंपनी आपल्या एकूण मनुष्यबळापैकी जवळपास नऊ टक्के कर्मचारी कपात करणार आहे. व्यवसायातील गुंतागुंत कमी करणे, वेगाने वाढणाऱया व्यवसायांकडे अधिक लक्ष देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या कर्मचारी कपातीआधी ईबेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात 800 कर्मचाऱ्यांना डच्चू दिला होता. त्यानंतरची ही दुसरी कर्मचारी कपात आहे. ईबेच्या प्रवक्त्यानेही या नोकरकपातीला दुजोरा दिला असून ज्या कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना येत्या काही दिवसांत सूचना दिली जाईल. ईबेमध्ये मागील वर्षीच्या अखेरीस नोकरकपातीपूर्वी कंपनीत 12 हजार 300 कर्मचारी कार्यरत होते

























































