ऑस्ट्रेलियन ओपन तिसऱ्या फेरीतच सेरेना आऊट

304

सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतलं आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले आहे. तिसऱ्या फेरीत चीनच्या क्विंग वँगने सेरेनावर 4-6, 7-6 (7-2), 5-7 अशी मात केली. तब्बल दोन तास 40 मिनीट चाललेल्या या सामन्यात चीनच्या क्विंग वँगने सेरेनाची झुंज मोडून काढत सनसनाटी विजय नोंदवला.

पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत दमदार पुनरागमन केलं. अखेरच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी झुंज दिली, मोक्याच्या क्षणी सेरेनाचं स्वतःवर नियंत्रण सुटल्याने क्विंगने त्याचा फायदा उचलला आणि आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवामुळे 24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे सेरेनाचे स्वप्न भंगले आहे. चौथ्या फेरीत वँगसमोर ट्युनिशीआच्या ओन्स जाबेउरचं आव्हान असेल.

आपली प्रतिक्रिया द्या