वंचितांचा बुलंद आवाज हरपला, ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ विचारवंत- लेखिका, प्रभावी वक्त्या आणि सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी मध्यरात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. दादर येथील कॉलनी नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती प्रा. अनंत भावे आहेत. वंचित- शोषितांचा आवाज आणि खंबीर स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणून पुष्पा भावे अखेरपर्यंत कार्य करत होत्या. त्यांच्या निधनाने अन्यायाविरुद्ध उठणारा आवाज शांत झाला, अशी भावना व्यक्त होत आहे.