सामना ऑनलाईन
2270 लेख
0 प्रतिक्रिया
नागोठण्यात लाखो विटांचा चिखल, मुसळधार पावसाचा तडाखा; वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल
नागोठणेतील वीटभट्टी व्यावसायिकांना मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसात लाखो कच्च्या विटांचा अक्षरशः चिखल झाला आहे. अतोनात नुकसान झाल्यामुळे वीट...
जपानी सर्व्हेअर अधिकाऱ्यांना वाढवणवासीयांनी हाकलले, गावात पाऊल टाकाल तर खबरदार
वाढवण बंदराचे काम मिळवलेल्या योशीन इंजिनीयरिंग कॉर्पोरेशन या जपानी कंपनीच्या सव्र्व्हेअरना आज वाढवणवासीयांनी गावच्या वेशीवरूनच हाकलून दिले. पुन्हा गावात पाऊल ठेवाल तर खबरदार, असा...
मुंबई-बडोदा महामार्गासाठी जमीन हडपली; शेतकऱ्यांना मोबदल्याची फुटकी कवडीही नाही
वनपट्ट्याची जमीन पिढ्यान्पिढ्या कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मुंबई-बडोदा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बुलडोझर फिरवून आंबा, चिकू, काजू, खजुरी, चिंचेची शेकडो झाडे जमीनदोस्त केली आहेत....
चला चला.. वळगण आली रे… पहिल्याच जोरदार पावसाने वळगणीचे मासे पकडण्यासाठी झुंबड
रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पहिल्याच आणि जोरदार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी मासे खवय्यांना मात्र मोठा लाभ झाला आहे. या पहिल्याच पावसात...
महाडमध्ये ‘तळीये’चा धोका, दरडी कोसळल्या, कोल गाव थोडक्यात बचावले
22 जुलै 2021 ची काळरात्र.. तुफान कोसळणारा पाऊस, विजांचा राक्षसी कडकडाट, सोसाट्याचे वारे वहात असतानाच महाडच्या 'तळीये' गावावर डोंगरकडा कोसळला, अख्खं गाव चिखलात गाडलं...
कळव्याच्या उघड्या, बोडक्या रेल्वे पुलाचा प्रवाशांना ताप; शेड आणि सरकत्या जिन्यासाठी शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम
न्यू शिवाजीनगर येथून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उंच रेल्वे पूल पार करण्यासाठी रेल्वे प्रवासी आणि नागरिकांची अक्षरशः दमछाक होत आहे. हा पूल चढताना ज्येष्ठ...
मेट्रोच्या कामामुळे ठाण्याच्या वाहतुकीत बदल; नाशिक, घोडबंदरच्या वाहतुकीवर परिणाम
संथ गतीने सुरू असलेल्या वडाळा-कासारवडवली मेट्रो स्थानकाच्या छताचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी वाहतूक 28 ते...
नाले तुंबलेलेच, दिवा बुडणार; शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा
पावसाळ्याला सुरुवात झाली असतानादेखील शहरातील नालेसफाई पूर्ण झालेली नाही. त्यातच ठाणे महापालिकेचा एक भाग असलेल्या दिव्यात तर नाले अद्याप तुंबलेले असल्याने यंदा पावसाळ्यात दिवा...
पोलीस डायरी – घराघरात ‘वैष्णवी’ ! गुंडापुंडाच्या राज्यात!
>> प्रभाकर पवार
हुंड्यासाठी वैष्णवी या 23 वर्षीय तरुणीचा बळी घेणाऱ्या पुणे जिल्ह्यातील (ता. मुळशी) भुकूमच्या हगवणे या अत्यंत विकृत कुटुंबाला बावधन पोलिसांनी गेल्या आठवड्यात...
20 कोटी रुपयांचं कर्ज, जीवे मारण्याची धमकी; मित्तल कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली धक्कादायक माहिती
प्रवीण मित्तल हे आधी उत्तराखंडमध्ये राहत होते. मित्त यांची हिमाचल प्रदेशमध्ये भंगाराचा कारखाना होता. त्यांनी व्यवसायासाठी 20 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. हे वेळत...
पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती ओढवली त्यासाठी भ्रष्टनाथ आणि सरकार जबाबदार, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती ओढवली त्यासाठी भ्रष्टनाथ आणि सरकार जबाबदार असा घणाघात टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी...
एका अपघातातून वाचले, दुसऱ्या अपघातात बीडमध्ये सहा जणांचा जागीत मृत्यू
बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सहा प्रवासी असलेली SUV गाडी डिव्हायडरला धडकली. अपघात झाल्यानंतर सर्व प्रवासी...
महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, काळजी न करण्याचे ICMR चे आवाहन
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असले तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घाबरून जाऊ नका असे आवाहन केले आहे. दिल्ली,...
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF च्या जवानाला अटक, धक्कादायक माहिती आली समोर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सीआरपीएफ जवानाला राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या सात दिवसांपूर्वी हा जवान पहलगाममध्येच होता. पहलगाममध्ये दहशतवादी...
पावसानं झोडपल्यानं भाजीपाल्याला महागाईची फोडणी? शेतकरी हैराण, ग्राहकांची दाणादाण
राज्यात दोन आठवड्यााधीच मान्सून दाखल झाला आणि राज्यात दाणादाण उडाली. अनेक भागांत पाणी साचलं होतं तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या...
शेखांच्या देशात मुरुडच्या कन्येचा बोलबाला, शीतल दांडेकरच्या चित्रांवर अरबांच्या पसंतीची मोहर
मुरुडची कन्या शीतल दांडेकर हिने तिच्यातील कलेने कत्तार गाजवले असून तिने जादुई ब्रशमधून साकारलेल्या चित्रांवर अरबांनी पसंतीची मोहोर उमटवली. कत्तारच्या दोहा येथील सौक वकिफ...
पावसाळ्यात आमची घरे उद्ध्वस्त करू नका हो ! आयरे गावातील ‘राघो हाईट्स’च्या रहिवाशांचा टाहो,
आम्ही रक्त आणि घाम गाळून पै पै कमवली आणि त्यातून आमच्या मुलाबाळांना, आई-वडिलांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी डोक्यावर हक्काचे छप्पर घेतले. पण ही इमारत बेकायदा...
कळवा, मुंब्रा, दिवावासीयांना ‘टोरंट’चा ‘शॉक’; पाच लाख रहिवाशांच्या नशिबी रोजच अंधारयात्रा
महावितरणची गच्छंती करून वीजपुरवठ्याचा सगळा कारभार हाती घेतलेल्या टोरंट पॉवर कंपनीने मनमानी कारभार करत कळवा, मुंब्रा, दिवावासीयांना 440 व्होल्टचा 'शॉक' दिला आहे. एकीकडे तिप्पट-चौपट...
पनवेलमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण; महापालिकेला खडबडून जाग, 2000 बेड्सचे विलगीकरण कक्ष सुरू
राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असतानाच पनवेलमध्येही तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन 200 बेड्सचे...
गोगावलेंचा आणखी एक कारनामा ; परवानगीविनाच सावित्रीतील गाळ काढण्याचे घाईघाईत उद्घाटन
वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले मिंधेंचे महाड येथील आमदार भरत गोगावले यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. सावित्री नदी पात्रातून गाळ उपसण्याची कोणतीही...
नवी मुंबईतील मैदानांवर शाळांचा बेकायदा कब्जा, नागरिकांना प्रवेश करण्यास मज्जाव; लग्न सोहळ्यासाठी तासाला दोन...
फक्त शाळा सुरू असल्याच्या कालावधीत शिक्षण संस्थांना दिलेल्या मैदानांवर शाळाच्या व्यवस्थापनांनी आता बेकायदा कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतर ही मैदाने सायंकाळी नागरिकांसाठी उपलब्ध करून...
सामना प्रभाव – कल्याणमधील 335 टन कचरा पालिकेने उचलला, दुर्गंधीच्या साम्राज्यातून नागरिकांची सुटका
कल्याण पूर्व भागात महापालिका प्रशासनाने विशेष साफसफाई मोहीम राबवून 335 टन कचरा उचलला. त्यामुळे या भागातील नागरिकांची दुर्गंधीच्या जाचातून सुटका झाली आहे. महापालिकेच्या गलथान...
मिंधेंचे खासदार म्हस्केंना भूमिपूजनापासून हिरानंदानीवासीयांनी रोखले, कावेसर तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुप करू नका !
कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचा नारळ फोडण्यासाठी आलेले मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना आज हिरानंदानीतील रहिवाशांनी रोखले. सुशोभीकरणाच्या नावाखाली इतर तलावांप्रमाणे कावेसरचा तलाव विद्रुप करू...
पालघर तापले; ठाणे-रायगड बुडाले, एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली; मुरुडमध्ये 24 तासांत 371 मिमी
ऐन मे महिन्यात पावसाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अक्षरशः धुमशान घातले. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवार गाजवला. त्यामुळे ठिकठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली....
हळदीवर पाणी फेरले; लग्न मंडप भिजले, अवकाळीने लग्नाचा बॅण्ड वाजवला
अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या लग्न समारंभांचा अक्षरशः बॅण्ड वाजला आहे. लग्नसराईचा शेवटचा महिना असल्याने मेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात...
शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरे यांचे आदेश
मुंबईत मान्सून दाखल झाला आहे आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सोमवारी कामासाठी निघालेला चाकरमानी अनेक ठिकाणी अडकला आहे. त्यामुळे शैवसैनिकांनी...
हा तर निर्लज्जपणाचा कळस, भाजप नेत्याच्या विधानाचा संजय राऊतांनी घेतला समाचार
भाजप हा देशातला नव्हे तर जगातला निर्लज्ज पक्ष आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच 26...
हत्ती जंगल सोडून शहरात घुसले; गडचिरोलीत दहशत
ओडिशावरून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप गेल्या 3 वर्षांपासून वनविभागासह गावाकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. यात दोन टस्कर हत्तींची भर पडली असून त्यांनी...
राज्यात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, आयपीएस शारदा राऊत यांच्याकडे धुरा
तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नार्को तस्करांच्या नांग्या ठेचण्यासाठी केंद्रीय यंत्रणेच्या धर्तीवर राज्यात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स सुरू करण्यात येणार आहे. आयपीएस...
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, दिवसभरात राज्यात 43 तर मुंबईत 35 रुग्ण; आतापर्यंत चौघांचा मृत्यू
राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज दिवसभरात राज्यात 43 रुग्ण सापडले तर त्यापैकी 35 रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत चार...