
सामना ऑनलाईन । भिवंडी
भिवंडीत पैसे मागितले म्हणून एका रिक्षाचालकाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने अंडाभुर्जीवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री वऱहाळदेवी रोडवर घडली. अजित गुप्ता असे मारहाण केलेल्या अंडाभुर्जी गाडीचालकाचे नाव आहे.
त्याच्या हातगाडीकर गणेश नावाचा रिक्षाचालक त्याच्या अन्य तीन साथीदारांसह अंडाभुर्जी खाण्यासाठी आला होता. अंडाभुर्जी खाल्ल्यानंतर झालेले शंभर रुपयांचे बिल अजित याने मागितले. त्यावरून चिडलेल्या गणेश व त्याच्या साथीदारांनी त्याला ठोश्याबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या मारहाणीचा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


































































