तरुणीसमोर रिक्षाचालक करत होता हस्तमैथून, पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुंबईत एक कॉलेज तरुणी रिक्षातून कॉलेजला जात होती. तेव्हा त्या मुलीला आरशात पाहून रिक्षाचालक हस्तमैथून करत होता. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालक अशोक खरवीला अटक केली आहे.

एका 18 वर्षीय कॉलेज तरुणीने गोरेगाव पश्चिमहून कॉलेजसाठी रिक्षा पकडली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिक्षाचालकाने शॉर्टकट घेण्यास सुरूवात केली. प्रवासादरम्यान तो सारखा आरशातून तरुणीकडे बघत होता. तसेच तो हस्तमैथून करत होता हे तरुणीच्या लक्षात आले. तेव्हा तरुणीने त्याचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला. तरुणीने त्याला तत्काळ रिक्षा थांबवण्यास सांगितले. तेव्हा रिक्षाचालक अशोक खरवी म्हणाला की आपण मालाडला अजून पोहोचलो नाहिये. अजून गोरेगावही गेले नाहिये. इथून तुम्ही चालत जाणार आहात की दुसरी रिक्षा पकडणार आहात? असे त्याने विचारल्यावर तरुणीने तुझा याच्याशी संबंध नाही असे सांगितले आणि रिक्षा थांबवायला लावली.

नंतर तरुणीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करून सर्व हकीगत सांगितली. तसेच अशा प्रकारांपासून सावध रहा असे आवाहनही तिने केले. हा व्हिडीओ एका महिला पत्रकाराने ट्विटरवर शेअर करून मुंबई पोलिसांन टॅग केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अशोक खरवीला अटक केली.