
देशभरात वाढत्या पेट्रोलच्या किंमतींमुळे तुम्ही त्रस्त झाला असाल, तर आपल्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा खर्च कमी असून हे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती सांगणार आहोत.
Ampere V48 LA
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत हिंदुस्थानात 28,900 रुपयांपासून सुरु होते. ही स्कूटर 48 व्ही -24 केआर लीड अॅसीट बॅटरीने सुसज्ज आहे, ज्याच्या मदतीने ही स्कूटर 25 किमी प्रतितास वेगाने चालण्यास सक्षम आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 45 ते 50 किमीपर्यंत धावू शकते.
Hero Optima
Hero Optima ची प्रारंभिक किंमत हिंदुस्थानात 41,770 रुएए इतकी आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. याची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 50 किमीपर्यंत धावू शकते. या स्कूटरमध्ये 250W क्षमतेची बीएलडीसी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे.
Okinawa Ridge
Okinawa हिंदुस्थानात इलेक्ट्रिक स्कूटरचा लोकप्रिय ब्रँड बनला आहे. Okinawa Ridge च्या एका इलेक्ट्रिक स्कूटरची प्रारंभिक किंमत 44,990 रुपये इतकी आहे. ही स्कूटर ताशी 60 किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे.
Bajaj Chetak
बजाज चेतक एक लोकप्रिय स्कूटर आहे आणि या स्कूटरच्या लोकप्रियतेचा फायदा घेत कंपनीने आपली इलेक्ट्रिक व्हर्जन बजाज चेतक इलेक्ट्रिक लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 3 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा संपूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 95 किमीपर्यंत धावू शकते.