Hero ची नवीन Electric Scooter लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावेल 210 किमी

दुचाकी उत्पादक कंपनी हीरो इलेक्ट्रिकने हिंदुस्थानात आपली नवीन इलेक्ट्रिक Optima Nyx-hx लॉन्च केली आहे. कंपनीची ही नवीन स्कूटर new City Speed सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ज्यात Optima-hx, Nyx-hx आणि Photon-hx सामील आहेत.

untitled-1-copy

हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर B 2 B व्यवसाय सेगमेंटमधील ग्राहकांसाठी विशेष करून सादर करण्यात आली आहे. नवीन Nyx-hx सिंगल चार्जमध्ये 210 किमी दाखवते, असा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर वजन घेऊन प्रवास करण्यासाठी उपयुक्त असून तुम्ही याची सीट वेगळी करून इतर कामांमध्ये त्याचा उपयोग करू शकता.

1602571089_hero-electric-scooters-hero-optima-hx-city-electric-scooters

या स्कूटरमध्ये 1.34 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. Nyx-hx ची टॉप स्पीड 45 km/h आहे. कंपनीने हीरो इलेक्ट्रिक चार्ज करण्यासाठी देशभरात 500 चार्जिंग स्टेशन स्थापित केले आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्कूटर चार्ज करू शकतात.

किंमत

कंपनीने या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 63,990 रुपये ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या