Hyundai i20 ‘या’ दिवशी होणार हिंदुस्थानात लॉन्च, 28 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरु…

दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने हिंदुस्थानात आपली बहुप्रतिक्षित कार i20 चे बुकिंग व लॉन्चिंगचा खुलासा केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची बुकिंग 28 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

आपल्याला ही कार बुक करायची असल्यास आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा डीलरशिपवरुन 21,000 रुपयांच्या टोकन रक्कमेसह बुक करू शकता. ग्राहक Hyundai क्लिक टू बाय बाय प्लॅटफॉर्मवरुनही i20 कार ऑनलाईन बुक करू शकतात.

‘चार व्हेरिएंट’मध्ये होणार लॉन्च

कंपनी आपली ही कार Magna, Sportz, Asta आणि Asta (O) या चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात येणार आहे.

कधी होणार लॉन्च

Hyundai i20 कार 5 नोव्हेंबरला हिंदुस्थानात लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या कारच्या इंजिन आणि फीचर्स बद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या