Kia Sonet हिंदुस्थानात लॉन्च, किंमत फक्त…

Kia Motors हिंदुस्थानात आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लॉन्च केली आहे. आज आम्ही तुम्हाला या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत बदल सांगणार आहोत.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

Kia Sonet मध्ये रिफाईंड 1.5 सीआरडीआय डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन (100 पीएसची उर्जा पॉवर) आणि दुसरे (115 पीएसची पॉवर) 6-स्पीड अॅडव्हान्स एटीसह येते. तसेच याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये जी 1.0 टी-जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 120 पीएसची पॉवर जनरेट करते. याचे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टस्ट्रीमसह येते.

सेफ्टी फीचर्स

Kia Sonet मध्ये ड्युअल एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, रियर पार्किंग सेन्सर, इमरजेंसी स्टॉप सिग्नल अशी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यात 26.03 सेमी टचस्क्रीन आणि 10.67 सेमी कलर क्लस्टर, स्मार्ट व्हेंटीलेटर सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत

Kia Sonet ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.71 लाख रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या