रॉयल एनफील्डची ‘बीएस 6 हिमालयन’ हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या किंमत

765

प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने आपली नवीन ‘बीएस 6 हिमालयन’ हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. नवीन हिमालयन बाईकमध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट्स दिले आहेत. यापैकी एक स्विचेबल एबीएस, किंवा अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकचे फीचर्स आणि याच्या किंमत बद्दल सांगणार आहोत.

बीएस 6 हिमालयन या बाईकमध्ये कंपनीने 411cc पेट्रोल इंजिन दिले आहे. या बाईकच्या स्पेसिफिकेशनमध्ये कोणताही बद्दल करण्यात आलेले नाही आहे. कंपनीने सहा रंगात ही बाईक लॉन्च केली आहे. ज्यात Lake Blue, Rock Red, Gravel Grey, Sleet Grey, Granite Black आणि Snow White रंगाचा समावेश आहे.

किंमत

या बाईकची एक्स-शोरूम किंमत 186,811 रुपये इतकी आहे. तसेच याच्या Granite Black आणि Snow White रंगाच्या व्हेरियंटची किंमत 186,811 रुपये आहे. तर याच्या Sleet Grey आणि Gravel Grey रंगांच्या व्हेरियंतची किंमत 189,565 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या