Piaggio ची इलेक्ट्रिक रिक्षा हिंदुस्थानात लॉन्च

1670

Piaggio ने आपली नवीन इलेक्ट्रिक रिक्षा हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. कंपनीने या रिक्षाचे नाव Ape Electric असे ठेवले आहे. या रिक्षाच वैशिष्ट्य म्हणजे, ही रिक्षा चालताना कुठल्याही प्रकारचा आवाज करत नाही. तसेच व्हायब्रेट ही होत नाही. ही इलेक्ट्रिक रिक्षा विना गीअर आणि क्लच शिवाय चालते. यामध्ये पूर्णपणे डिजिटल क्लस्टर उपलब्ध आहे. चला तर या इलेक्ट्रिक रिक्षा बद्दल आणखीन जाणून घेऊ…

Ape Electric विजेवर चालते, म्हणून तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तसेच बॅटरी स्वॅपचा पर्याय मिळवणारी ही देशातील पहिली 3-चाकी वाहन आहे. म्हणजेच आपण कंपनीच्या पॉवर स्टेशनवर जाऊन याची बॅटरी स्वॅप (बदल) करू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ 2 ते 5 मिनिटांची आहे. ग्राहकांना कंपनीकडून निश्चित आणि स्वॅप करण्यायोग्य दोन्ही बॅटरीचा पर्याय दिला जाणार आहे.

परफॉर्मन्स

Piaggio Ape E- City मध्ये लिथियम आयन, 48 व्ही बॅटरी देण्यात आली आहे. जी 4.5 kWh क्षमतेसह येते. याची मोटर 3500 आरपीएमवर 5.4 किलोवॅट क्षमतेची पॉवर आणि 29 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही रिक्षा 68 किमीपर्यंत चालू शकते.

किंमत

या रिक्षाची किंमत कंपनीने 1.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या