
स्वदेशी दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने अलीकडेच हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन Himalayan 2021 लॉन्च केली आहे. कंपनीच्या या अॅडव्हेंचर टूरर बाईकमध्ये आता दोन नवीन कलर ऑप्शन्ससह काही खास बदल केले आहेत. कंपनीने याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेले नाही. आज आपण याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ट्रिपर नेव्हिगेशन
रॉयल एनफील्ड बाईक प्रमाणेच नवीन हिमालयीमध्ये डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोलजवळ ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम फीचर्स देण्यात आले आहे. ही एक Google द्वारा ऑपरेट टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम आहे, जी ब्लूटूथद्वारे रॉयल एनफील्ड अॅपद्वारे आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट झाल्यानंतर कार्य करते.
नवीन कलर ऑप्शन
कंपनीने आपल्या ग्राहकांना हिमालय 2021 अधिक आकर्षक बनविण्यासाठी नवीन कलर पर्याय दिले आहेत. नवीन हिमालयात दोन नवीन कलर देण्यात आले आहे, ज्यात पाइन ग्रीन आणि ग्रॅनाइट ब्लॅकचा समावेश आहे.
इंजिन
कंपनीने यात 411 सीसीचे सिंगल सिलिंडर, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 24.3bhp ची पीक पॉवर आणि 32Nm ची टॉर्क जनरेट करते.




























































