Royal Enfield ची नवीन Meteor 350 बाईक ‘या’ दिवशी होणार लॉन्च; किंमत किती?

Royal Enfield च्या चाहत्यांसाठी Meteor 350 बाईकची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अनेकवेळा लॉन्चिंग पुढे ढकलल्यानंतर आता Meteor 350 ची लॉन्चिंग निश्चित झाली आहे. मात्र असं असलं तरी कंपनी ही बाईक 2021 मध्येच लॉन्च करणार अशी चर्चा ऑटो बाजारात रंगली होती.

तीन व्हेरिएंटमध्ये होणार उपलब्ध

Meteor 350 ही बाईक कंपनी तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करणार आहे. पहिली Fireball, दुसरी Stellar आणि तिसरी Supernova असं या व्हेरिएंटचे नाव आहे. ऑनलाइन उपलब्ध माहितीनुसार, रॉयल एनफील्ड दुचाकीमध्ये ब्लूटूथ नेव्हिगेशन सिस्टम मिळणार आहे.

Meteor 350 मध्ये 350 सीसी सिंगल सिलिंड एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे लाँग स्ट्रोक इंजिन आहे. जे 20.2 बीएचपीची पॉवर आणि 27 एनएमची पीक टॉर्क जनरते करते. ही बाईक कंपनीची Thunderbird 350X ची जागा घेणार.

या दिवशी होणार लॉन्च

Royal Enfield ची ही बाईक 6 नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. याची किंमत १.60 लाख ते १.75 लाख दरम्यान असू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या