टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, नाही होणार कर्मचाऱ्यांची कपात!

1528

टाटा मोटर्सने आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्ष सुरु होण्याआधीच नवीन वर्षाची भेट दिली आहे. कंपनीने हिंदुस्थानी वाहन क्षेत्रात मंदी असतानाही आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार नसल्याचे जाहीर केलं आहे. कंपनीने अशा व्यक्त केली आहे की, येत्या काही महिन्यात बाजारात कंपनीचे नवीन उत्पादन लॉन्च झाल्यावर कंपनीच्या आर्थिक परिस्थिती सुधार होईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक गुंटर बटशेक यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

वाहन क्षेत्रात असेल्या मंदीमुळे कंपनी कर्मचाऱ्यांची कपात करू शकते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले आहेत की, ‘आमची अशी कोणतीही योजना नाही. जर कंपनीला असं काही करायचं असत, तर कंपनीने ते आधीच केलं असत. आम्ही 12 महिन्यांपासून आर्थिक संकटातून जात आहोत. जर कंपनीला कर्मचाऱ्यांची कपात लारायची असती तर ती आम्ही आधीच केली असती,’ असे ते म्हणाले आहेत.

येत्या नवीन वर्षात कंपनी आपली नवीन नेक्सन ईव्ही आणि Gravitas एसयूव्हीसोबतच अनेक नवीन उत्पादने बाजारात लॉन्च करणार आहे. यासंबधीतच बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘मला खात्री आहे की अर्थव्यवस्था कोणत्याही दिशेने जाऊ द्या, आम्ही बाजारात चांगले प्रदर्शन करण्यासाठी तयार आहोत.’

आपली प्रतिक्रिया द्या