टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार या दिवशी होणार लॉन्च, एका चार्जिंगमध्ये 312 किमीचा प्रवास…

1713

वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स लवकरच हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. Tata Nexon EV असं या कराच नाव आहे. कंपनी ही कार Auto Expo 2020 च्या आधी हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे. Nexon EV ही इलेक्ट्रिक श्रेणीमधील पहिली कार आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. चला तर जाणून घेऊन या कारच्या फीचर्स आणि किंमत बद्दल.

Tata Nexon EV मध्ये मॅगनेट एसी मोटर देण्यात आली आहे. यात आयपी 67 प्रमाणित लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी पाणी आणि धुळीमुळे खराब होत नाही. सिंगल चार्जिंगमध्ये ही कार 312 कि.मी.पर्यंतचे धावू शकते. याची इलेक्ट्रिक मोटर 95 केडब्ल्यू म्हणजेच 129 एचपी पॉवर आणि 245 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 9.9 सेकंदात ताशी 100 किमी गती प्राप्त करून शकते.

बॅटरी वॉरंटी

फास्ट डीसी चार्जरने या कारची बॅटरी एक तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते. कंपनीने याच्या बॅटरीवर आठ वर्षाची वॉरंटी दिली आहे. या कारच्या किंमत बद्दल अद्याप कळू शकलेलं नाही. कंपनी 28 जानेवारी रोजी ( मंगळवारी ) ही कार लॉन्च करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या