‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स, मिळणार जबदस्त फीचर्स आणि मायलेज

देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच प्रत्येकजण इतर पारंपारिक पर्यायांचा विचार करीत आहे. मात्र यात सर्वात जास्त अडचण दुचाकी चालकांची झाली आहे. कारण इलेक्ट्रिक दुचाकी सोडल्यास इतर दुचाकी फक्त पेट्रोलवरच धावतात. तुम्ही जर वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे त्रस्त झाला असाल, तर आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त आणि अधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सबद्दल माहिती सांगणार आहोत.

Bajaj Platina 100 ES

Platina 100 Electric Start मध्ये 102 सीसीचे 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, डीटीएस-आय इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवरप 7.9 PS ची पॉवर आणि 5500 आरपीएम पर 8.3 Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच Platina 110 H-Gear चे इंजिन 4-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशनयुक्त आहे. Platina 100 Electric Start मध्ये स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे, यामुळे दुरचा आणि ओबड-धोबड रस्त्यावरील प्रवासही आरामशीर होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनी या बाईकची किंमत 53,990 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

TVS Sport

सर्वाधिक ऑन रॉड मायलेजसाठी या बाईकची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. याआधीही टीव्हीएस स्पोर्टची बाईकची सर्वाधीक ऑन रॉड मायलेजसाठी या रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मागील वर्षी या बाईकच्या बीएस 4 मॉडेलने 76.4 किमी प्रतिलिटरचे मायलेज दिले होते. या रेकॉर्डसाठी टीव्हीएस स्पोर्ट बाईकने 1021.90 किमीचा प्रवास केला. हा प्रवास करत असताना या बाईकने 9.28 लिटर पेट्रोल वापरले आहे.

TVS Sport मध्ये 109.7cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 7350 Rpm वर 8.18 Hp ची पॉवर आणि 4500 Rpm वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त कंपनीने या बाईकमध्ये इकोथ्रस्ट फ्युएल टेक तंत्रज्ञानाचा समावेशही केला आहे. कंपनीचा असा दावा आहे की, ही बाईक मागील मॉडेलपेक्षा 15 टक्के अधिक मायलेज देईल. याचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्ससह येते. कंपनीने या बाईकची किंमत 56,100 रुपये इतकी ठेवली आहे.

Hero Splendor Plus

Hero Splendor Plus BS6 सर्वाधिक विक्री होणारी आणि पसंद केली जाणारी बाईक आहे. Hero Splendor Plus BS6 मध्ये 97.2cc एयर कुल्ड, 4 -स्ट्रोक सिंगल सिलिंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर 7.91 Hp ची पॉवर आणि 6000 Rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक स्टार्ट आणि किक स्टार्टचे फिचर दिले आहे. तसेच कंपनीने या बाईकमध्ये ऍडव्हान्स प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्शन दिले आहे. हे इंजिन 4 स्पीड कंटीस्टंट मॅश गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. याची किंमत 59,945 रुपयांपासून सुरु होऊन 64,855 रुपयांपर्यंत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या