
स्वदेशी दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटरने आपली नवीन स्कूटर TVS Jupiter ZX हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. ही स्कूटर 15 टक्के अधिक मायलेज देणार असल्याचा दावा केला आहे. TVS Jupiter ZX मध्ये कंपनीने पहिल्यांदाच intelliGO तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आज आपण याच स्कूटरच्या किंमत आणि फीचर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ग्राहकांना इंधन वाचवण्यासाठी आणि चांगले मायलेज देण्यासाठी कंपनी म्हटले आहे की, intelliGO तंत्रज्ञानाच्या मदतीने ही स्कूटर सिग्नल आणि रस्त्यावर इतर अडथळ्यांच्या दरम्यान आपोआप थांबेल. ज्यानंतर आपण पुन्हा थ्रॉटल फिरवून इंजिन सुरू करू शकता. या स्कूटरच्या समोरील चाकास 220 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील चाकावर 130 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.
इंजिन आणि फीचर्स
TVS Jupiter ZX मध्ये 110 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे 7.3hp पॉवर आणि 8.4 NM टॉर्क जनरेट करेल. यात ऑल-एलईडी हेडलॅम्प्स, 2-लिटर ग्लोव्ह बॉक्स, मोबाइल चार्जर आणि 21-लिटरचा एक मोठा अंडरसाइट स्टोरेज सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत
कंपनीने या स्कूटरची किंमत 72,347 रुपये (एक्स -शोरूम) इतकी ठेवली आहे.





























































