
वाहन निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने हिंदुस्थानात आपली नवीन बाईक Tvs Apache 200 लॉन्च केली आहे. देशात याची स्पर्धा bajaj pulsar ns200 शी होणार आहे. कंपनीने ही बाईक तीन रंग पर्यायसह लॉन्च केली आहे. ज्यात ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅटी ब्लूचा समावेश आहे. आज आपण याच बाईकच्या इंजिनमी फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
फीचर्स
TVS Apache RTR 200 4V चा लूक स्पोर्टी आहे. या बाईकमध्ये स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे तीन रायडींग मोड देण्यात आले आहेत. याशिवाय यात TVS SmartXonect ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, शोवा रिअर मोनो-शॉक आणि अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स सारखे फीचर्स देण्यात आहे. यासोबतच यात नवीन एलईडी आणि डीआरएलही देण्यात आले आहे.
इंजिन
Apache RTR 200 मध्ये 4V197.75cc सिंगल-सिलेंडर, फोर-वाल्व्ह, ऑइल-कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. याचे इंजिन 8,500rpm वर 20.5PS ची पॉवर आणि 7,500rpm वर 16.8Nm टॉर्क जनरेट करते.
किंमत
ही बाईक दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. याच्या Apache RTR 200 4V सिंगल-चॅनलची किंमत 1,33,840 (एक्स-शोरूम), तर याच्या ड्युअल ABS व्हेरिएंटची किंमत 1,38,890 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.




























































