
कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात रुग्णांची वाढलेली संख्या तसेच कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता शक्यतो सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचा प्रवास टाळा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 13 ते 14 जणांना कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या टप्पा दोनमध्ये असून टप्पा तीनची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज असून स्व्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
ओळखपत्र तपासून प्रवासास परवानगी
मुंबई उपनगरी रेल्वेगाडय़ांचा सेवेचा वापर हा केवळ अत्याकश्यक कामांसाठी करण्यात यावा. सार्कजनिक काहतुकीद्वारे होणारी गर्दी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ही गर्दी कमी झाली नाही तर सार्वजनिक प्रवासी वाहतूकही बंद करावी लागेल. त्यासाठी लोकांचे ओळखपत्र तपासल्यानंतर लोकांना प्रवासास परवानगी देणे हा एकच पर्याय असल्याचे टोपे यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकांवरील गर्दी चिंताजनक
सर्वच कार्यालये क दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आल्यानंतर लोकल गाडय़ांमध्ये होणाऱया गर्दीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. रेल्वे स्थानकांवर वाढणारी गर्दीही चिंताजनक असून ही गर्दी टाळण्यासाठी काहीजण प्रतिसाद देत आहेत. लोकांची गर्दी कमी व्हावी यासाठी मुख्यमंत्री काही रेल्वे स्थानकांना भेट देण्याची शक्यता असल्याचे टोपे म्हणाले.




























































