
मुंबई ही केवळ गगनचुंबी इमारतींची किंवा धावपळीच्या जीवनशैलीची नगरी नाही; तिच्या मुळाशी आहेत इथले मूळ रहिवासी-कोळी समाज. समुद्राशी नातं जपणारे कोळी आणि त्यांची वस्ती असलेले कोळीवाडे हे मुंबईच्या संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे.
वाढत्या शहरीकरणाच्या लाटेत कोळीवाडे बदलत असले तरी त्यांची भाषा, सण, देवदेवता आणि समुद्रावरची श्रद्धा अजूनही टिकून आहे. मुंबईच्या प्रगतीच्या इतिहासात कोळी समाजाचं योगदान मोलाचं आहे. म्हणूनच, मुंबई समजून घ्यायची असेल तर तिच्या कोळीवाडय़ांत डोकावणं अपरिहार्य ठरतं.
महेश नेने प्रॉडक्शन यांनी वेसावकर आणि मंडळी यांच्या सहकार्याने असाच एक प्रयत्न केलाय. ‘आवाज कोळीवाडय़ाचा’ या विशेष टॅलेंट हंट शोमधून मुंबईतील कोळीवाडय़ातील कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यात स्पर्धक नृत्य, गायन, वादन, अभिनय, स्टॅण्ड अप कॉमेडी अशी कुठलीही कला सादर करू शकतात. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – महेश नेने ः 9820787163




























































