अयोध्येत बाबरच्या नावाने मशीद उभारणार नाही

584

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून अयोध्येत मिळणाऱया 5 एकर जमिनीवर बाबरच्या नावाने कुठलीही मशिद वा रुग्णालय उभारणार नाही, असे स्पष्टीकरण सुन्नी वक्फ बोर्डाच्या ट्रस्टने दिले आहे. या जागेवर सर्वसाधारण रुग्णालय (बाबरचे नाव नसलेले), संशोधन केंद्र आणि पुस्तकपेढी उभारण्यात येईल, असे ट्रस्टतर्फे शुक्रवारी एका पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले. अयोध्येच्या धनीपूर परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मिळालेल्या जमिनीचा उपयोग कसा करायचा हे ठरवण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने ’इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन’ ही ट्रस्ट स्थापन केली आहे. ट्रस्टने धनीपूरच्या पाच एकर जमिनीवर बाबरच्या नावाने मशिद किंवा त्याचेच नाव असलेले रुग्णालय उभारण्याची योजना आखली आहे, असे मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. या अफकांचे ट्रस्टने अधिकृत पत्रक काढून खंडन केले. बाबरच्या नावाने कुठलीही मशिद वा रुग्णालय उभारणार नसल्याचे ट्रस्टने पत्रकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या