अयोध्येत जमावबंदी; राम मंदिराच्या निकालापर्यंत निर्णय लागू

अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवरील सुनावणीचा युक्तीवाद अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 17 ऑक्टोबरला या प्रकरणाचा शेवटचा युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर थेट या प्रकरणाचा निकाल लावण्यात येणार असून हा निकाल 17 नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे.

राम मंदिराच्या सर्वोच्च न्यायालयातील निकाल काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे खबदारीची भूमिका म्हणून अयोध्येत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून लागू करण्यात आलेली ही संचारबंदी 10 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. या प्रकरणाचा अखेरचा युक्तीवाद 17 ऑक्टोबरला होणार असून त्यानंतर महिनाभरानेच म्हणजे 17 नोव्हेंबरला या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबरलाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते राम मंदिर प्रकरणी निकाल देऊनच निवृत्त होतील असे बोलले जात आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत राम मंदिराच्या जागेवर दिवाळीत दिवे लावण्याची परवानगी मागितली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या याचिकेनंतर मुस्लीम पक्षाकारांनी देखील त्या ठिकाणी नमाज पढता यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूकडील नेत्यांच्या या मागण्यांमुळे या भागात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या