#AYODHYAVERDICT – राम मंदिर निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

2881
aaditya-thackeray

सर्वोच्च न्यायालयाने आज अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रामलल्ला जन्मभूमीवरील प्रलंबित खटल्याचा निकाल जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा ही श्रीरामाची म्हणजेच रामलल्लाची असल्याचे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निकालानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या निकालावर त्यांची पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आदित्य यांनी ट्विटरवर ‘जय श्री राम!’ लिहत या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे हे हजारो शिवसैनिकांसोबत भगवे वादळ घेऊन रामजन्मभूमीत दाखल झाले होते. प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण व्हावे यासाठी ‘जय श्रीराम’चा नारा देण्यात आला होता. त्यावेळी अयोध्येत पहिल्या शिवसेनेच्या शाखेचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या