बाला चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

685

विकी डोनर, दम लगा के हैशा, बरेली की बर्फी, बधाई हो, अंधाधुन, आर्टिकल 15 अशा विविध चित्रपटांमधून दमदार आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आयुषमान खुराणाच्या ‘बाला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात आयुषमानसह यामी गौतमी आणि भूमी पेडणेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तरुणपणी पडणारे टक्कल या समस्येवर आधारित हा चित्रपट आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच आयुषमान एका वर्गात मुलींना सौंदर्याबद्दल सांगत असतो. तेव्हा भूमी पेडणेकर त्याची टोपी काढते आणि तो टकला असल्याचे समोर येतं. तेव्हा आयुषमानच्या या अकाली टकलाची समस्या आणि त्याचे दुःख अतिशय विनोदी पद्धतीन दाखवण्यात आले आहे. केस येण्यासाठी आणि मुलगी मिळवण्यासाठी आयुषमान काय काय करामती करतो याचे सुंदर चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या