डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे जागतिक स्तराचे स्मारक उभारले जाणार आहे. स्मारकाचे काम वेगाने पार पाडण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची चौथऱयासह 450 फूट करण्याचा निर्णय घेतला. 100 फूट चौथऱयावर 350 फूट उंचीचा हा पुतळा जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार उभारणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश किकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत होणे अपेक्षित आहे. यासाठी 9 फेब्रुकारी 2018 रोजी कार्यादेश देण्यात आले असून सर्क संरचनात्मक आराखडय़ांचे 100 टक्के काम पूर्ण होऊन आकश्यक त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तत्काळ घेण्यात याक्यात असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.

1089 कोटींचा खर्च
स्मारकासाठी याआधी 763 कोटींचा खर्च अपेक्षित होता. पुतळ्याची उंची काढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. यामुळे 1089 कोटी इतका खर्च येणार आहे. खर्चामध्ये 763 कोटी इतका खर्च येणार आहे.

राजकारण करण्यापेक्षा काम वेगाने पूर्ण करणार -अजित पवार
इंदू मिल स्मारकाबाबत भाजप सरकारकडून तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दोषारोप करण्यात येत होते, मात्र इंदू मिल स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतरही पाच वर्षांत स्मारकाचे विशेष काम झाले नाही. पण महाराष्ट्र विकास आघाडीचे हे सरकार राजकारण करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्मारकाचे काम वेगाने पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दोनच वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल. या स्मारकाच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविली जाणार आहे. त्याचप्रमाणे अन्य मंत्रीही या कामावर लक्ष ठेवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

असे असेल स्मारक
स्मारकामध्ये बौद्ध कास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय क प्रदर्शन भरकिण्याची सोय असेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयाचाही समावेश करण्यात येणार आहे. पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसन क्षमता असलेले क्याख्यान कर्ग क कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल, तसेच 1000 लोकांची आसन क्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.