सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काहींना तर मिलियन्सच्या घरात व्ह्यूज मिळतात. सध्या चिमुकल्या मुलांच्या एका डान्स व्हिडिओची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या व्हिडिओला तब्बल 800 कोटी व्ह्यूज मिळाले असून आजवरचा सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे.
गिनीज बुकात झाली नोंद
‘बेबी शार्क डान्स’ नावाच्या व्हिडिओला नेटिझन्सने चांगलीच पसंती दिली आहे. या व्हिडिओत मुलं डान्स करताना पाहायला मिळत आहेत. pinkfong चॅनेलवर हा व्हिडिओ 18 जून 2016 साली पोस्ट करण्यात आला होता. अवघ्या दोन मिनिट 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे.
n कोरोनामुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करतायत. घरी असल्यामुळे मुलं पालकांच्या कामात व्यत्यय आणतात. आपल्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पालक मुलांना कार्टुनचे व्हिडिओ लावून देतात. त्यामुळेच ‘बेबी शार्क डान्स’ हा व्हिडिओ यू-टय़ूबवर हिट झाला आहे.























































