पदोन्नतीपासून डावलले! मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची उद्या आझाद मैदानात रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही राज्य सरकारने मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱयांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. याच्या निषेधार्थ मंगळवार 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील मगासर्वीय अधिकारी आणि कर्मचारी आझाद मैदानात निषेध रॅली काढणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑगस्ट रोजी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबतच्या देशभरातील 76 याचिकांवर निर्णय देताना मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मागासलेपणा सिद्ध करण्याची अट रद्द करून आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या याचिकेवर निर्णय झाला नसल्याचे सांगत सरकार अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे. याच्या निषेधार्थ स्वतंत्र मजदेर युनियनचे अध्यक्ष जे.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढण्यात येणार असल्याचे सरचिटणीस एन.बी. जारोंडे यांनी सांगितले.