‘बागी-3’ मधील टायगर श्रॉफचा हा जबरदस्त लूक पाहाच…

1526

‘बागी’ आणि ‘बागी-2’ नंतर टायगर श्रॉफ ‘बागी-3’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा येत आहे. टायगर श्रॉफचा ‘बागी-3’ चित्रपटामधील फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. स्लिवलेस् जॅकेट, कार्गो पँट, सनग्लासेस असा हा टायगरचा हॉट अवतार चाहत्यांना भूरळ घालत आहे.

टायगर श्रॉफला बॉलिवूडमधील ‘मल्टी-टॅलेंटेड’ अभिनेता म्हटले जाते. रोमान्सपासून ते डान्स आणि क्राईम पासून ते मारधाडपर्यंत भूमिका साकारणाऱ्या टायगरने अल्पावधीत आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. टायगरची बॉडी आणि त्याचा डान्स पाहूण अनेक जण त्याला फॉलो करतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारा टायगर आपल्या फिटनेसचे आणि चित्रपटांचे व्हिडीओ, फोटो अपलोड करत असतो. नुकताच त्याने ‘बागी-3’ मधील आपला फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.


View this post on Instagram

#baaghi3 #actionday2

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

स्लिवलेस् जॅकेट, कार्गो पँट आणि सनग्लासेस अशा हॉट अवतारात टायगर दिसत आहे. फोटो पाहून तरी टायगरची या चित्रपटातील भूमिका डॅशिंग असणार असेच वाटते. याच चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर काम करणार आहे, तसेच रितेश देशमुखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मार्च 2020 ला हा प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या