बहरीन सरकारचा निर्णय, 250 हिंदुस्थानींची शिक्षा माफ होणार

480

बहरीनमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 250 हिंदुस्थानींना माफी मिळणार असून त्यांची लकरच सुटका करण्याचा निर्णय बहरीन सरकारने मानवीय आधारार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीन दौरा केल्यानंतर तेथील सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमधून ही माहिती देण्यात आली आहे. दया आणि मानता दाखवून बहरीन सरकारने 250 हिंदुस्थानींना माफी दिली आहे. बहरीनमधील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या या हिंदुस्थानी नागरिकांची आता लकरच सुटका करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बहरीन सरकारचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा दौरा केल्यानंतर यूएईचा दौरा केला. त्यानंतर ते बहरीनला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनाद किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँहा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोदींनी बहरीनचे शाह हमाद बिन इसा अल खलिफा यांच्यासोबत विविध प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा केली. बहरीनचा दौरा करणारे मोदी पहिले हिंदुस्थानी पंतप्रधान आहेत. या वेळी दोन्ही नेत्यांनी संस्कृती, अंतराळ, आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करारास्वाक्षरी केली.

आपली प्रतिक्रिया द्या