पेशवाई पुन्हा जिवंत होणार!

123

पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेतलेली ‘बाजी’ ही नवी फक्त १०० भागांचीच मालिका येत्या सोमवारी ३० जुलैला झी मराठी वाहिनीवर सुरू होतेय. पेशवाईच्या त्या काळात ‘शेरा’ नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते. पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती. यात बाजीची व्यक्तिरेखा अभिजीत श्वेताचंद्र साकारणार असून नूपुर दैठणकर ही क्षत्रीय नृत्यांगना हिराच्या प्रमुख भूमिकेत दिसणार असून शेराचे पात्र प्रखरसिंग साकारणार आहे.

या मालिकेचं चित्रीकरण पुणे, भोर, सातारा आणि सासवड येथे झालं आहे. या मालिकेत १७७० मधील अनेक खऱ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. संतोष कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतल्याचे नूपुरने सांगितले. नूपुरने यात लावण्यवती, धाडसी आणि घोडेस्वारी व तलवारबाजी करणारी नायिका साकारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या