वंदन शिवतेजा! शिवसेनाप्रमुखांची आज 95 वी जयंती

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे स्फूर्तीचा जिवंत झरा… लाखो शिवसैनिक आणि कोट्यवधी हिंदूंचे दैवत… या प्रखर शिवतेजाने मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वासाचा वन्ही चेतवला. स्वाभिमानाची ऊर्मी जागवली… मनामनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला. शिवसेनाप्रमुख म्हणजे देव, देश आणि हिंदुत्वरक्षणाचे सरसेनापती… उद्या शनिवारी शिवसेनाप्रमुखांचा 95 वा जन्मदिन. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या वतीने मानवंदना दिली जाईल, तर हजारो शिवसैनिक आपल्या लाडक्या साहेबांना शिवतीर्थावरील त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करतील… पण गर्दी टाळण्याची शिस्त पाळूनच!

महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, मराठी स्वाभिमानासाठी झपाटून काम करा असा मंत्र शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. कोरोना नियमावलीमुळे शिवतीर्थावर जाणे अनेकांना शक्य होणार नसले तरी राज्यातील शिवसेना शाखा, कार्यालये आदी ठिकाणी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली जाणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या