बाळासाहेब ठाकरे ‘आयएएस’ अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग 27 जुलैपासून सुरू होणार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयएएस अपॅडमीमध्ये अकरावी, बारावी, पदवीपूर्व व पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासाची पूर्वतयारी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हे  प्रशिक्षण वर्ग 27 जुलैपासून सुरू होणार आहेत.

शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अपॅडमीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांना चार प्रकारचे अभ्यासक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन शिकण्याची संधी मिळेल. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी (एनडीए) हा अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठी वयोमर्यादा साडेसतरा वर्षे एवढी आहे. 21 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी (सीडीएस) पदवीधर हा अभ्यासक्रम, तर 21 ते 32 वयोगटासाठी यूपीएससी (सीएस) पदवीधर हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय 18 ते 20 या वयोगटासाठी यूपीएससी (एफसी) पदवीपूर्व हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी कुबेलिस्क इमारत, युनियन पार्क मार्ग क्र. 1, पाली हिल रोड, वांद्रे पश्चिम येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत भेट द्यावी, असे आवाहन शिवसेना उपनेते आणि अपॅडमीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम यांनी केले आहे. संपर्क – 9619116390.