
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी, 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम ‘झंझावात’ मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम रविवारी दुपारी 3.30 वाजता आणि रात्री 10 वाजता बघता येईल.
बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांनी घेतली आहे. कार्यक्रमाची निर्मिती जयू भाटकर यांची आहे. ‘झंझावात’ चे चित्रीकरण मे 2002 साली ‘मातोश्री’ येथे करण्यात आले होते. त्यानंतर अनेक वेळा याचे प्रसारण सह्याद्री वाहिनीवरून झाले आहे. रविवारी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येणार आहे.





























































