काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षाचा प्रचार चालणार नाही, थोरातांचा विखेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balasaheb-thorat-radhakrish

सामना प्रतिनिधी । नगर

निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपाचा करणार असेल तर ते चालणार नाही, अशा शब्दात आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टोला लगावला. तसेच याबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पातळीवर याची चर्चा होईल असे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी नगर येथे काँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यानंतर ते बोलत होते.

थोरात म्हणाले की, मी काँग्रेसचा, पण भाजपचा प्रचार कोण करत असेल तर याची निश्‍चिपणे दखल घेतली जाईल. आम्ही सुध्दा अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या आहेत. तशा घटना सुध्दा यामतदार संघात घडल्या आहेत. अशा घटनांवर आमचे लक्ष आहे. पण असे कोणी प्रचार करीत असतील तर ते चालणार नाही, वरिष्ठ पातळीवरचे नेते निश्‍चित या संदर्भात निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या प्रचाराचा नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे सोमवारी नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. आपल्यालाही दिल्ली बैठक असल्याने ती बैठक आटोपती झाल्यावर नगरमध्ये पवार यांची भेट घेण्याचा मी प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.