‘क्विक रिऍक्शन’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बालासोर

जमिनीवरून हवेत मारा करणाऱया, सर्व हवामानात तग धरून राहणाऱया क्विक रिऍक्शन सरफेस टू एअर मिसाईल (क्यूआरएसएएम) या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली.

25 ते 30 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र ट्रक किंवा मोटारीवरून एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेले जाऊ शकते. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ)ने लष्करासाठी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता चंडीपोर येथे ही चाचणी करण्यात आली.