प्रेक्षकांचे मन जिंकायला ‘बालभारती’ येतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतीक्षित बालभारती या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये आर्यन मेंघजी या बालकलाकारासोबत सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर मुख्य भूमिकेत आहे. आर्यन एक महान शास्त्र्ाज्ञ आईनस्टाईनच्या पोशाखात दिसतोय. आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारणाऱया सिद्धार्थच्या हातात इंग्रजीतून मराठी शब्दकोश आहे, तर नंदिताने हेल्मेट घातले आहे ज्यावर टॉक इन इंग्लिश असे शब्द लिहिलेले आहेत. यावरून नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटाच्या विषयाचा अंदाज येईल. पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे, तर उत्तम शिक्षण. हीच कळकळ यात गुंफलेली आहे.

बालभारती म्हणजे गमतीशीर कथा आणि मनाला भिडणारा संदेश यांची गुंफण. हा चित्रपट मराठी भाषा, सर्जनशीलता आणि शोध यांना एकत्र आणतो तोही अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने. स्फियरओरिजीन्स निर्मित आणि नितीन नंदन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 11 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.