
हशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवल्याबद्दल तुरुंगवासात असलेला इंडोनेशियन इस्लामी धर्मगुरू अबू बकर बशीर याला सरकारने 10 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्त केले आहे. बाली बेटावर जिहादी बॉम्बस्पह्ट घडवून 202 नागरिकांचा जीव घेण्याच्या कटाचा सूत्रधार म्हणून बशीरवर गंभीर आरोप आहेत. पण आरोप सिद्ध न झाल्याने बशीरला इंडोनेशियन सरकारने मुक्त केले आहे.
बालीच्या बॉम्बस्फोटात 88 ऑस्ट्रेलियन पर्यटकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे बशीरच्या सुटकेबद्दल ऑस्ट्रलियान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तुरुंगातून मुक्त झाल्यावर बशीरला त्याच्या मध्य जावामधील निवासस्थानी नेण्यात आले.
बशीर अलकायदाशी संबंध ठेवणाऱ्या जिमाह इस्लामियाचा (JI) आध्यात्मिक नेता म्हणून ओळखला जातो. 2011 मध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवल्याबद्दल बशीरला 15 वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. पण रशिदचा 2002 बाली बॉम्बस्पह्ट आणि 2003 च्या जाकार्ता हल्ल्यात सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नाही, असे इंडोनेशियन पोलीस आणि गुप्तचरांचे म्हणणे आहे.


























































