
मुलांची कलेची आवड जोपासण्यासाठी बालनाट्य शाळांमधून विशेष प्रयत्न केले जातात. गंधार बालनाट्य शाळा त्यापैकीच एक.
लहान मुलांमध्ये नाटकाची आवड निर्माण व्हावी आणि सुजाण प्रेक्षक घडावेत यासाठी गंधार बालनाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली आणि पुण्यात सिंहगड, कोथरुड येथे 8 ते 15 वयोगटातील मुलांसाठी ही कार्यशाळा सुरू होत आहे.
जानेवारी ते मे आणि जुलै ते नोव्हेंबर अशा दोन व्हेकेशनमध्ये गंधार बालनाट्य कार्यशाळा घेतली जाते. हे बेसिक कोर्स आहेत. दर रविवारी मुलांच्या सोयीनुसार ठरलेल्या वेळी ही शाळा आयोजित केली जाते. ऍडव्हान कोर्स वर्षभरासाठी असतो. याचं कारण असं की, काही मुले नवोदित असतात. काहींना नाटकाची गोडी नसते, तर काहींना असते. अशांकरिता नाटकाबाबत त्यांच्या माहितीत वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न करतो. त्यानंतरच्या शाळेत या विषयाचा सखोल अभ्यास प्रायोगिक स्तरासह घेतला जातो. ऍडव्हान्स कोर्समध्ये प्रत्यक्ष व्यक्तिरेखा साकारण्याचा भाग शिकवला जातो. अशी या बालनाट्य कार्यशाळेची पद्धत आहे, अशी माहिती कार्यशाळेचे संयोजक बालकृष्ण ओढेकर यांनी दिली.
प्रेक्षकांना कसं सामोरं जावं, नाटक करताना काय भान ठेवावं, भूमिकेतील बारकावे मुलांच्या लक्षात यावेत यासाठी अनुभवी कलाकार मुलांना मार्गदर्शन करतात. कार्यशाळेचा कालावधी पूर्ण झाला की, मुलांकडून बालनाट्य बसवून घेतले जाते. त्याचे प्रयोग होतात. यामुळे रंगमंचावरी कामाचा अनुभव मिळतो.
बालनाट्य कार्यशाळेचं अनोखेपण…
मुलांमधील देहबोली, संवाद साधण्याची पद्धत, व्यक्तिरेखा घडण्यासाठी कसे प्रयत्न करावेत अशा अभियनयाच्या सर्व अंगांचा अभ्यास या कार्यशाळेत करून घेतला जातो. याकरिता तज्ञ आणि अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन मुलांना लाभते. सहभाग घेतलेल्या बालकलाकारांना बालनाटय़ात काम करण्याची संधी दिली जाते. शिवाय प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं कौतुकही करण्यात येतं.
कार्यशाळेचे ठिकाण
- ज्ञानसाधना विद्या निकेतन, ठाणे
- आनंद बालभवन, डोंबिवली
- परांजपे हायस्कूल, कोथरुड




























































