बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; 12 ठार

422

बलुचिस्तानच्या क्वेटा मशिदीमध्ये नमाजादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी झाले. हा दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला भ्याड हल्ला असून या घटनेचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले आहेत. या हल्ल्याच्या तीन दिवसआधी क्वेटामध्येच आणखी एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ट्वीटरवरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जखमींना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्याचे आदेशही इम्रान खान यांनी बलुचिस्तानातील प्रशासनाला दिले आहेत.

मृतांमध्ये पोलीस उप अधीक्षक हमानुल्ला यांचाही समावेश असल्याचे क्वेटाच्या पोलीस उप महानिरीक्षकांनी सांगितले. पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार हमानुल्ला यांना निशाणा बनवण्यासाठीच हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार गेल्याच महिन्यात हमानुल्ला यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या