
पॉर्न साईट्सचा लहान मुले आणि तरुणांवर वाईट प्रभाव पडतो. तसेच त्याच्यामुळे महिलांविरोधातील गुन्ह्यात वाढ होत आहे म्हणून त्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
Bihar CM’s Office: CM Nitish Kumar has written to PM Modi, requesting him to put a ban on porn sites & inappropriate content on internet, as long-term usage of such content is negatively affecting the mentality of some people, leading to rise in crimes against women. (file pics) pic.twitter.com/pC2oKpbQZw
— ANI (@ANI) December 16, 2019
नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मागणी केली आहे. नितीश कुमार यांनी पत्र लिहून म्हटले की, “देशात होणार्या महिलांवर अमानुष पद्धतीने अत्याचाराच्या घटनांमुळे जनमानसांत संतापाची भावना आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. लहान मुले आणि तरुण इंटरनेटवर अश्लील, हिंसक असा आशय पाहत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले होते.” लहान मुलांवर याचा गंभीर प्रभाव पडत असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
तसेच अशा आशयामुळे काही लोकांवर दुरगामी नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. देशात माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आहे परंतु त्याची योग्य ती अंमलबजावणी होतान दिसत नाहिये. म्हणून इंटरनेट सेवा पुरवणार्यांनाही योग्य ते निर्देश द्यावे. तसेच इंटरनेटवरील सर्व पॉर्न आणि अश्लील आशयाव बंदी घालावी अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे.



























































