मराठी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. ट्विटरवरून त्याने त्या अभिनेत्याला अटक केली होती. रिझवान खान असे त्या तरुणाचे नाव असून तो एक टेम्पो चालक आहे.

एका मराठी अभिनेत्याला त्याच्या ट्विटर अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर रिझवान खानने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ”इस्लाम विरोधात जो कुणी काहीही बोलेल त्याची हत्या करू’ अशी धमकीच रिझवानने त्या पोस्टवर प्रितिक्रीया देताना दिली होती. सायबर क्राईम सेलने त्याची ती धमकी पाहिल्यानंतर त्याला कलम 153 दोन समुदायामध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली. त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.